अचूक शेती
शाश्वत शेती आणि वातावरणातील बदलांना तोंड देण्यासाठी अचूक शेतीचे तंत्रज्ञान गरजेचे आहे
अचूक शेती या शब्दाचा अर्थ आहे धोरणे आणि साधनांची अशी मालिका जी शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता यांची योग्य पातळी राखण्यात आणि वाढवण्यात मदत करते तसेच लक्ष्यित मुख्य उपाययोजनांची एक मालिका सुचवते, ज्याचा परिणाम वाढत्या प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त केला जाऊ शकतो.
या तंत्राला “अचूक” असे संबोधले जाते कारण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने पिकांच्या आणि जमिनीच्या गरजेनुसार योग्य उपाययोजना, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी अधिक अचूकपणे करणे शक्य होते.
तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम अचूक आकडेवारी आणि तपशीलवार माहिती गोळा करण्यासाठी होतो, ज्याचा वापर करून उत्पादनवाढीसाठी अचूक निर्णय घेता येतात आणि पिक व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या सुधारता येतात.
सध्या सर्वत्र कृषी ४.० ची चर्चा आहे जो अचूक शेतीचाच पुढचा टप्पा आहे. या संकल्पनेमध्ये क्षेत्रिय आकडेवारीच्या उत्पादनवाढीसाठी वापराबरोबरच एकमेकांशी जोडलेली अत्याधुनिक उपकरणे वापरण्याचा समावेश आहे.