पिक आरोग्य व्यवस्थापन
पिक आरोग्य व्यवस्थापन : एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) हे पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी एक पर्यावरणस्नेही तंत्र आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन हे पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी एक पर्यावरणस्नेही तंत्र आहे जे सहज करता येण्यासारख्या कमी खर्चाच्या उपाययोजनांवर भर देते. किडींच्या जीवनचक्राचा बारकाईने अभ्यास करून पर्यावरणाशी त्याचा संबंध कसा आहे ते पाहून या उपाययोजना करता येतात. या पद्धतींची रासायनिक कीड नियंत्रणाशी योग्य सांगड घातली तर कमी खर्चात आणि मानवी जीवन, संसाधने आणि पर्यावरणाला कमीतकमी हानी होईल अशा पध्दतीने कीड नियंत्रण करता येते.
एकात्मिक कीड व्यवस्थापनाची प्रक्रिया
आयपीएम ही एकचएक अशी कीड नियंत्रणाची पध्दत नसून त्यामध्ये किडींच्या नुकसानीचे सर्वेक्षण, योग्य निर्णय आणि नियंत्रणाच्या अनेक पध्दती या सर्व घटकांची ती एक साखळी आहे. आयपीएममध्ये किडींच्या प्रदुर्भावाबाबत जागरूक असलेले शेतकरी एका चतु:सुत्रीचा वापर करतात. या चार पायऱ्या अशा आहेत:
- उपाययोजना सुरु करण्यासाठी किमान नुकसानीची पातळी ठरवणे
- किडींची ओळख आणि सर्वेक्षण
- प्रतिबंधात्मक उपाययोजना
- नियंत्रण