दावा व्यवस्थापन सेवा
पीक पेरणी क्षेत्र
शासनाने पुरवलेल्या तालुका व गाव पातळी वरील पीक पेरणी क्षेत्राची आणि सुदूर संवेदन (रीमोट सेन्सिंग) ने मोजलेल्या पीक पेरणी क्षेत्राची तुलना करून त्यात अचूकता आणणे (८०-९० % अचूकता).
क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग
ग्रीन बायोमास (NDVI), आरोग्य (हरीतद्रव्य) आणि पाण्याचा ताण (NDWI) या गोष्टी वरील पीक निर्देशकांच्या सहाय्याने दर्शवीता येतात. पीक वाढीच्या विविध गंभीर टप्प्यांवर तालुका स्तरावर किंवा गाव पातळीवर शेतांची तुलना करणे शक्य होते आणि त्याचबरीबर पीक स्थिती निश्चित करता येते. कीटक, रोग, जमिनीची क्षारता आणि हवामानाच्या धोक्यामुळे पिकाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना ओळखणे सोप्पे होते.
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन
रडार डेटा (सेंटिनल -1) च्या आधारे प्रभावित क्षेत्र ओळखणे सोप्पे होते आणि बुडीतपणामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करता येते. आम्ही विमा कंपन्यांच्या आवश्यकतेनुसारe विहित नमुन्यात वैयक्तिक पीक नुकसानीचे मूल्यांकन सर्वेक्षण देखील प्रदान करतो.
स्मार्ट सॅम्पलिंग
पीकवाढीच्या टप्प्यात पिकाचे आरोग्य विचारात घेऊन स्मार्ट सॅम्पलिंग हे स्तरिय यादृच्छिक नमुना आहे आणि ते अधिक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. पीएमएफबीवायने स्मार्ट नमुना घेणे अनिवार्य केले आहे ज्याचे अनेक राज्ये अनुसरण करीत आहेत. स्मार्ट सॅम्पलिंगसाठी प्रत्येक तालुक्याचे पीक निर्देशकांच्या ,हवामान विषयी माहिती आणि पीक आरोग्याच्या आधारे स्तरीकरण केले जाते आणि प्रत्येक स्तरातून सीसीईसाठी गावे यादृच्छिकपणे निवडली जातात. हे अधिक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, जे सी.सी.ई. निवडण्याची खात्री देते ज्यामुळे उत्पादनाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळते.
सीसीई सह-निरीक्षण
अर्थार्थ क्रॉपटेक अ ॅपचा वापर करून एंड-टू-एंड डिजिटल पुराव्यासह सी.सी.ई.च्या सह-निरीक्षणात तज्ञ आहे. सीसीई डेटा 'क्रॉपटेक' अ ॅपद्वारे अर्थपूर्ण वेब पोर्टलवर रिअल टाइम कॅप्चर केला जातो. देखरेखीसाठी ग्राहकांना डॅशबोर्ड प्रवेश प्रदान केला जातो. संपूर्ण पिकांच्या हंगामात जमिनीच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी समर्पित कर्मचारी शेतात तैनात केले जातात.